Monday, 11 March 2013

आर्यभट्ट

आर्यभट्ट 



 


पाचव्या शतकात सूर्य-चंद्र यांचे वेध घेणारे एक महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ. काळ इ.स. ४७६. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती यासंबंधी स्पष्ट कल्पना आर्यभट्ट यांनी त्या काळात मांडली. त्यांच्या या संशोधनामुळे भारताच्या पहिल्या उपग्रहास त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी ‘आर्यभटिका’ हा ग्रंथ लिहून सार्‍या जगात भारताचे नाव उज्ज्वल केले.  


Read vigyan ( Please Add Skeep ) ................... 


गॅलिलीओच्या १ हजार वर्षे आधीआर्यभट्टांनी
पृथ्वी गोल असल्याचे सांगणे व तिचा व्यासही सांगणे    

          आर्यभट्टांनी (इ.स. ५ वे शतक) आपल्या ‘आर्यभट्टीयम्’ नामक ग्रंथामध्ये प्रथम पृथ्वी गोल असल्याचा उल्लेख करून पृथ्वीचा व्यासही अचूक सांगितला.  

मृज्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः । - आर्यभट्टीयम्, ४-६ 

अर्थ : माती, पाणी, अग्नी व वायू यांनी युक्त अशी पृथ्वी गोल आहे.
        याच ग्रंथामध्ये ‘नृषियोजनं, ञिला भूव्यासो ........’ असे सूत्र आले आहे. याचा अर्थ ‘नर x षि · योजना व ‘ञिला’ योजनेएवढा पृथ्वीचा व्यास आहे’, असा होतो. यामधून पृथ्वीच्या व्यासाचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला ‘आर्यभट्टीय अंक पद्धतीची’ आवश्यकता आहे. याच ग्रंथामध्ये ती दिली आहे. 





‘आर्यभट्टीय अंक पद्धती’ म्हणजे संक्षेपाने व सूत्ररूपाने ग्रंथ लिहिण्यासाठी तयार केलेली एक सांकेतिक भाषा. यामध्ये ‘क’ ते ‘म’ मुळाक्षरांना १ ते २५ असे आकडे दिले आहेत. म्हणजे क · १, ख · २, ग · ३ .... भ · २४, म · २५, य · ३०, र · ४०, ल · ५० ... ह · १००. स्वरांमध्ये ‘इ’कार म्हणजे ‘गुणिले १००’, ‘उ’ कार म्हणजे ‘गुणिले १०,०००’ व ‘ऋ’कार म्हणजे ‘गुणिले १०,००,००० (दहा लाख).’ अशा पद्धतीने अत्यंत सोपी अशी ही आर्यभट्टीय अंक पद्धती आपल्याला समजली की, ‘ञिला भूव्यासो’ या सूत्राचा अर्थ समजेल.
= १०, इ = x १००, ञि (ञ + इ) = १० x १०० = १०००
= ५० म्हणून ञिला = १००० + ५० = १०५०
म्हणजे पृथ्वीचा व्यास १०५० योजने एवढा आहे.         ‘नृषि योजना’ या सूत्रावरून १ योजन = किती किलोमीटर हे काढता येते. नृ x षि म्हणजे १ योजन. नृ म्हणजे माणसाची सरासरी उंची. (याचे प्रमाणही प्रस्तुत ग्रंथात दिलेले असून विस्तारभयास्तव येथे मांडलेले नाही.) षि =+= ८० x १०० = ८०००० म्हणजे १ योजन. माणसाची सरासरी उंची x ८०००० हे सर्व गणित करून त्या वेळी १ योजन म्हणजे १२.११ कि.मी. होते व ही संख्या जेव्हा ‘ञिला भूव्यासः’ या सूत्रामध्ये घालतो, तेव्हा आपल्याला पृथ्वीचा व्यास १२,७१६ कि.मी. एवढा मिळतो. आता उपग्रहांच्या सहाय्याने मोजलेला पृथ्वीचा व्यास १२७५६ कि.मी. आहे.’ 




आर्यभट्टांनी एका सूत्रावरून पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे, हे सांगणे  

        ‘याच आर्यभट्टांनी ‘भ’ अपक्रमो ग्रहांशः ।’ या सूत्रावरून ‘पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे’, हे सांगितले आहे. भ = २४ म्हणजेच पृथ्वी २४ अंशांनी कललेली आहे. आताच्या विज्ञानाने तीच संख्या (value) २३.५ अंश अशी सांगितली आहे.

वराहमिहिर

Article Image वराहमिहिर
ग्रहगोलांचा अभ्यास वैज्ञानिकदृष्टीने करणारे ५ व्या शतकातील एक थोर भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयांचा आचार्य वराहमिहिर यांचा गाढा अभ्यास होता.

Article Image नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

Article Image नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

भारतीय रसायनशास्त्राचे जनक. ७ व्या शतकाच्या प्रारंभातील शास्त्रज्ञ. सिद्ध नागार्जुन यांचे रसायनशास्त्रातील कार्य अविस्मरणीय आहे. विशेषत: सुवर्णाचा (सोने) पाठपुरावा आणि पार्‍यावरील त्यांचे संशोधन अतुलनीय होते.




devotional


Contage email

गर्गमुनी

गर्गमुनी 


Article Image


कौरव-पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण युद्धाच्या प्रारंभीच्या पक्षामध्ये तिथीक्षय होऊन तेराव्या दिवशी अमावास्या आली होती. नंतरच्या पक्षातही तिथीक्षय होता. पौर्णिमा चौदाव्या दिवशी आली आणि त्यादिवशी चंद्रग्रहण होते, असे भविष्य गर्गमुनी यांनी वर्तविले होते. 

 

 

Read Marathi News ( Please Add Skeep ) .............. ........... 

 

जीवक

जीवक 


Article Image


  बुद्धकालीन म्हणजेच अंदाजे ३ सहस्र वर्षांपूर्वी जीवक हे वैद्यकशास्त्रात पारंगत असे शास्त्रज्ञ होऊन गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ज्ञान संपादन केले. आयुर्वेद, वैद्यक आणि वनस्पतीशास्त्र यांचे गाढे अभ्यासक. प्रत्यक्ष भगवान बुद्ध यांच्यावर त्यांनी औषधोपचार केले होते. भारतीय वैद्य परंपरेत बुद्धदेवाच्या परिवारातील एक निष्णात वैद्य म्हणून जीवक यांचे स्थान आहे. 

 

 

भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय... 

जगभरातील गणितींना विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ !

Article Image

जगभरातील गणितींना
विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ ! 




गोवर्धनपीठ, पुरीचे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी अपरंपार परिश्रम आणि ध्यान यांद्वारे `अथर्ववेदा’तील `सुलभसूत्र’ (गणितसूत्र) परिशिष्टातील प्रत्येक अक्षरातून १६ सूत्रे हस्तगत केली. या १६ सूत्रांमुळे अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सरळरेषा अन् गोलीय भूमिती, कॅलक्युलस, गतीशास्त्र, लोकस्थिती-गणित (स्टॅटिस्टीक्स) अशा सगळ्या शाखा अभ्यासणे सुलभ होते. प्रचंड संख्यांचे गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग करणे अतिशय सोपे होते. त्यांचा ‘वैदिक गणित’ हा ग्रंथ प्रकाशित झाला, तेव्हा सगळे जग स्तिमित झाले. आता ‘वैदिक गणिता’वर जगभरातील विद्यापिठांमधून संशोधन होत आहे.

        एका पहाणीनुसार अलीकडे भारतात उच्च अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षांमध्ये सहभागी होणारे बहुतांश विद्यार्थी ‘वैदिक गणित’ मोठ्या प्रमाणात वापरतात. व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘कॅट’ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘गेट’ या परीक्षांमध्ये साध्या पद्धतीनुसार एखादे गणित सोडवण्यास चार मिनिटे लागत असतील, तर वैदिक गणितातील पद्धतींमुळे ते चार सेकंदांत सोडवता येते. 

कर्करोग प्रतिबंधित करणारे पातंजलीऋषींचे योगशास्त्र !

कर्करोग प्रतिबंधित करणारे
पातंजलीऋषींचे योगशास्त्र ! 


Article Image


‘पातंजलीऋषींनी २१५० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘योगशास्त्र’, हा कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर सुपरिणामकारक उपचार असून योगसाधनेमुळे कर्करोग प्रतिबंधित होतो.’

- भारत शासनाच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) ५ वर्षांच्या संशोधनाचा निष्कर्ष !