Monday, 11 March 2013

भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम

भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम 




         ‘कैकयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभु रामचंद्र आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनवासाला निघाले. वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले. तो धावत धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्यापुढे लोटांगण घालून म्हणाला, "प्रभु, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो ! मी आपली कोणती सेवा करू ?''

         रामप्रभु म्हणाले, "गुहका, तुझ्याकडून दुसर्‍या कुठल्याच प्रकारच्या सेवेची आम्ही अपेक्षा करत नाही. केवळ तुझ्या नावेतून तू आम्हाला गंगेच्या पैलतिराला पोहोचव.'' त्याप्रमाणे गुहकाने त्या तिघांना पैलतिराला नेऊन सोडले. पैलतिरी पोहोचविल्यावर त्यांच्यात पुढील संवाद झाला.
राम : गुहका, नावेतून आम्हाला पैलतिराला पोहोचविल्याबद्दल मी तुला काय देऊ ?
गुहक : प्रभु, एक न्हावी दुसर्‍या न्हाव्याचे केस कापतो, तेव्हा तो त्याच्याकडून मोबदला घेतो का ?
राम : नाही.
गुहक : प्रभु, एक वैद्य दुसर्‍या वैद्याला औषध देतो, तेव्हा तो त्याच्याकडून औषधाचा मोबदला घेतो का ? 

राम : नाही.
गुहक : मग त्याचप्रमाणे मी आणि आपण असे दोघेही नावाडी असतांना मी आपल्याकडून मोबदला कसा काय घेऊ ?
(गुहकाच्या या विधानाने राम आश्चर्यचकित झाला.)
राम : गुहका, तू नावाडी आहेस, हे उघडच आहे; पण तू मलाही नावाडी कसे काय करून टाकलेस ?
गुहक : प्रभु, मी लोकांना या नदीच्या पैलतिराला पोहचवितो; पण आपण तर इच्छुक प्रवाशांना भवसागराच्या, म्हणजे संसाररूपी सागराच्या पैलतिराला नेऊन पोहोचते करता. तेव्हा आपण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ नावाडी नाही का ?

        गुहकाचा हा युक्तीवाद ऐकून आणि त्याचे निरपेक्ष प्रेम पाहून रामप्रभूंनी त्याला दृढ आलिंगन दिले. रामप्रभूंकडून अलिंगन सुख म्हणजे प्रत्यक्ष जिवा-शिवाची भेट. गुहकाला आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. गुहकाला राम हा अवतार आहे, हे लक्षात आले. यावरून त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असला पाहिजे, हे लक्षात येते.’
- डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)  

मच्छिंद्रनाथांचा जन्म

मच्छिंद्रनाथांचा जन्म 



एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले. गौरीची व्यथा ऐकून त्यांनी अंतज्र्ञानाने शिवाचा शोध घेऊन त्याचे बसण्याचे ठिकाण तिला सांगितले. गौरीने शिवासमोर भिल्लिणीच्या वेषात जाऊन संगीतप्रधान नृत्याला सुरुवात केली.

त्या आवाजाने शिवाची समाधी उतरली. त्याने स्मित करत तिला विचारले, ‘‘शाबरी, तू मला दिव्य समाधीतून जागृत का केलेस ?’’ तेव्हा शाबरी म्हणाली, ‘‘आपण वर्षभर मला सोडून या समाधीवस्थेत कसे राहिलात, या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे.’’ शिव म्हणाला, ‘‘सांगीन; परंतु आता इथे नाही. जेथे मानवाची वस्ती नसेल आणि जेथे ते रहस्य कुणी ऐकणार नाही, अशा ठिकाणी मी ते तुला सांगीन.’’ काही दिवस गेल्यावर गौरीने शिवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली. शिव तिला घेऊन निबिड जंगलात यमुनानदीच्या किनारी आला आणि ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागला; कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती.  


 
त्याच वेळी यमुना नदीतील एका मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते. कवी नारायणांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवेश केला आणि तिचा गर्भ दिसामासी वाढू लागला. शिव सांगत असलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले. भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटातून म्हणाले, ‘सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहिले आहे, हेच आपल्या उपदेशाचे सार आहे.’
हे वाक्य ऐकताच कवी नारायण मत्स्यीच्या पोटी जन्म घेणार असल्याचे शंकराने ताडले आणि त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘मच्छिंद्रा, तुम्ही पुढे बदि्रकाश्रमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी दत्तात्रेयांच्या मुखातून तुम्हाला करवीन.’’ मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले.
त्यानंतर पूर्णमास भरताच मत्स्यीच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला.

विमानाचा शोध लावणारे भारद्वाजऋषी !

विमानाचा शोध लावणारे भारद्वाजऋषी ! 



परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार

परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार 



 


परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही.
 

आईवडील

        परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला.
    



कार्य

अधम अशा क्षत्रियांचा वध : `वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन' न म्हणता `राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.'
           कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
            परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.' या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.

Read agriculture ( Please Skeep Add ) ..............................


क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.
  

     अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.
तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर', असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक : एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.
दानशूर : परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.


भूमीची नवनिर्मिती : जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.' यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र' ही संज्ञा आहे.
         परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.
 

Read Children Stori ( Plese add Skeep ) ....-.......-......-


परशुरामक्षेत्रे

        सह्याद्रीच्या उत्तर टोकावर साल्हेरच्या डोंगरावरील मध्ययुगीन गडावर, पंजाबात कांगडा जिल्ह्यामध्ये, कोकणात चिपळूणपासून पाच मैलांवरील एका डोंगरावर तसेच गोमंतकात काणकोण येथे परशुरामाचे एक पुरातन मंदिर आहे.
 

मूर्ती

        भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची मूर्ती असते.
 

पूजाविधी

        परशुराम हा श्रीविष्णूचा अवतार असल्याने तो उपास्यदेवता म्हणून पुजला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती एक कात व उत्सव म्हणून साजरी केली जाते.  


बौद्धयन

Article Image बौद्धयन

५०० वर्षांपूर्वी (खिस्तपूर्व ५००) ‘पायथागोरस सिद्धांत’चा वेध घेणारा भारतीय भूमितीतज्ज्ञ. सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारतीय भूमितीतज्ज्ञांनी भूमितीशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले. 
 
 
 
 

औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

Article Image औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

इ.स. पूर्व १०० ते २०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील आयुर्वेदतज्ज्ञ म्हणजे चरकाचार्य. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेदशास्त्रावरील ग्रंथाचा निर्माणकर्ता. चरकाला ‘काया चिकीत्सक’ 
 
 
 
 
 

शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

Article Image शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

‘आयुर्वेद उपचारपद्धती जगाला १६ व्या शतकापर्यंत ज्ञात नव्हती. १६ व्या शतकात जर्मन डॉक्टरांनी भारताला भेट दिली. तेव्हा ‘सुश्रुताचार्य ‘रेनोप्लास्टिक सर्जरी’ त्यांच्या व्यवसायात वापरत होते’, असे त्यांना याविषयीचा अभ्यास करतांना आढळले.