Tuesday, 12 March 2013

गणपतीचे मारक रूप

गणपतीचे मारक रूप 



बालमित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपतिबाप्पाची गोष्ट पहाणार आहोत. आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया.

        सिंधुरासुर नावाचा एक राक्षस होता. तो अतिशय शक्तीशाली होता. त्याचे सैन्यही अफाट होते. इतरांना त्याच्यापुढे नेहमीच पराभव पत्करावा लागे. तो देवतांना त्रास देत असे. ऋषीमुनींच्या यज्ञयागात, तपात तो नेहमी अडथळे आणत असे. त्याच्या जाचाला कंटाळून देवता आणि ऋषीमुनी यांनी मिळून त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला; पण अशा शक्तीशाली असुराला मारणार कोण, असा सर्वांना प्रश्न पडला. तेव्हा पराशरऋषी गणपतीकडे गेले आणि त्यांनी त्याला सिंधुरासुराचा वध करण्याची विनंती केली.
        गणपति उंदरावर आरूढ झाला आणि आपले सैन्य घेऊन स्वारी युद्धाला निघाली. दुरून गणपति येत आहे, हे सिंधुरासुराच्या पहारेकऱ्यांनी पाहिले. त्यांनी ही गोष्ट जाऊन सिंधुरासुराला सांगितली. सिंधुरासुराला त्याच्याशी कोणीतरी लढायला येत आहे, हे ऐकून फार आश्चर्य वाटले. गणपतीसारखा छोटासा बालक माझ्याशी लढणार, या विचाराने त्याला हसू आले. 






एवढ्यात गणपति त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला. त्याने सिंधुरासुराला युद्धासाठी पुकारले. सिंधुरासुर त्याला धरून चिरडणार एवढ्यात गणपतीने आपला चमत्कार दाखवला. त्याचे रूप राक्षसाच्या दुपटी-तिपटीने वाढले. गणपतीने त्याला उचलले आणि मारायला प्रारंभ केला. राक्षस रक्तबंबाळ झाला. हे पाहून सिंधुरासुराच्या सैन्याने तेथून धूम ठोकली. सिंधुरासुराच्या लाल रक्ताने गणपतीचे अंग भिजले. तो लाल-शेंदरी दिसत होता. अखेर सिंधुरासुराचा अंत झाला आणि गणपतीचा राग शांत झाला. शक्तीशाली सिंधुरासुरावर बालगणपतीने विजय मिळवला, हे पाहून सर्व देवतांना त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचा जयजयकार केला.
        असाच एक अंगलासुर नावाचा दुष्ट राक्षस होता. तोही सिंधुरासुराप्रमाणे सर्वांना त्रास देत असे. अंगलासुर तोंडातून आग फेकत असे. त्याच्या दृष्टीस जे जे पडे, तो ते जाळून टाके. त्याच्या डोळयांतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत. तोंडातून धुराचे लोट उसळत. सर्वांना त्याची फार भीती वाटत असे.
        अंगलासुराने अशी अनेक जंगले जाळली होती. शेतातली पिके, जनावरे, पशुपक्षी, माणसे यांना जाळून तो त्यांची राख करी. अनेक राक्षसांना गणपतीने मारले आहे, हे अंगलासुराला ठाऊक होते. त्याला गणपतीचा सूड घ्यायचा होता. गणेशाचा वध करायचा होता; म्हणून तो त्याच्या शोधात होता; पण गणपति त्याच्या हाती लागत नव्हता. 


एके दिवशी श्री गणेशाने आपले छोटे रूप पालटले. तो अंगलासुराच्या तिप्पट उंच झाला. हे पाहून राक्षस घाबरला. श्री गणेशाने त्या राक्षसाला हातात उचलले आणि सुपारीसारखे खाऊन टाकले. त्यामुळे गणेशाच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. ती आग न्यून करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी यांनी त्याला दूर्वा वाहिल्या. दुर्वांनी आग थांबली आणि गणपति शांत झाला.
        पुढे गणेशाने विघ्नासुर या राक्षसाचाही नाश केला; म्हणून त्याचे विघ्नेश्वर हे नाव पडले.

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी 



नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया.

        फार पूर्वी महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केले आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्थान बळकावले. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तपणे वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना प्रार्थना केली अन् या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास विनवले. 


तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली. शंकराच्या तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने तीन डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एकेक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात् दुर्गादेवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र, अशी विविध आयुधे सर्व देवांनी तिला बहाल केली.
        देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्वशक्तीमान दुर्गादेवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. महिषासुर आणि दुर्गा यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध झाले. दुर्गादेवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गादेवीला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले. या प्रसंगाची आठवण म्हणून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. 






मुलांनो, आपण नवरात्रीचा उत्सव का साजरा करतो, ते कळले ना ! मग त्या दिवसांत आजकाल चालणाऱ्या गरब्याविषयी तुम्हाला काय वाटते ? धांगडधिंगा घालून मोठमोठ्या आवाजात गाणी लावून अंगविक्षेप करून नाचणे योग्य आहे का ? याविषयी तुम्ही इतरांचे प्रबोधन करून हिंदु धर्माविषयी ज्ञान देऊ शकता.

भक्त प्रल्हाद

भक्त प्रल्हाद 




हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. 'देवांपेक्षा मीच मोठा', असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. 'नारायण नारायण' असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही; म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येतच नसे. तरीपण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी. 


Read Love Stori ( Please Add Skeep ) ........................... 



एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे, हे कळलेच नाही. राजाने नामजप ऐकताक्षणीच सेवकांना आज्ञा केली की, डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा. सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले. थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येतांना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला. काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून 'प्रल्हाद राजवाड्यात येताक्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा', अशी त्याने सेवकांना आज्ञा केली. राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला. राजाने त्याला विचारले, ''सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले कि नाही ?'' प्रल्हादाने उत्तर दिले ''हो.'' राजाने पुन्हा विचारले, ''मग तू इथे परत कसा आलास ?'' तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला, ''मी एका झाडावर अलगद पडलो. झाडावरून उतरलो. तेथूनच एक बैलगाडी जात होती. तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो. का कुणास ठाऊक; पण माझ्यासमवेत सतत कुणीतरी आहे, असे मला वाटत होते; म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो.'' राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला जायला सांगितले. 


Read Jok ( Please Add Skeep ) ....................... 




काही दिवस उलटले. राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली. प्रल्हाद 'नारायण नारायण' असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की, जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. सेवक घाबरले; कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली; पण काय करणार ? राजाज्ञा ऐकायलाच हवी; म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. 'आता याला कोण वाचवतो', हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. रागाने आपल्या परिवारासह निघून गेला. 



Read Samaj Stori ( Please Skeep Add )............................... 



राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ''बोल, कुठे आहे तुझा देव ?'' प्रल्हादाने सांगितले, ''सगळीकडे.'' राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ''दाखव तुझा देव या खांबात.'' तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता.

        मुलांनो, प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धाऊन येईल.

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!  

 

 

एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे. असे वाटून ती आपल्या गळयातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देते आहे.

        ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो.
        हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस ? प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस ?
        तेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही ते सर्व मी टाकून दिले. 





मारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो.
        ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळयात घालतो.
        मुलांनो, जी गोष्ट देवाचे स्मरण करून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. आपणही प्रत्येक कृती करतांना कुलदेवीचे स्मरण करून आणि प्रार्थना करूनच केली पाहिजे.

 

श्रेष्ठ ईश्वरभक्ती

श्रेष्ठ ईश्वरभक्ती 



नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत 'नारायण नारायण' असा जप करत असतो. देवाचा आपल्याइतका खरा भक्त त्रिखंडात कोणीही नाही. ही गोष्ट भगवान विष्णूला समजली. आपल्या भक्ताला गर्व होऊ नये; म्हणून देव नेहमीच भक्ताची काळजी घेत असतो. नारदाचा गर्व नाहीसा करावयाचा, असे देवाने ठरवले.

        एक दिवस नारदमुनी विष्णूकडे गेले असता विष्णूने नारदांना विचारले, ''देवर्षी, तुम्ही जेव्हा पृथ्वीवर जाता, तेव्हा तेथे असलेल्या माझ्या भक्तांची भेट घेता का ? तेथे माझा एक खरा भक्त रहातो.'' हे ऐकून नारदमुनी विचारात पडले. त्यांना वाटले, 'आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असणार ?' 




कोण खरा भक्त आहे, हे पहाण्यासाठी नारदमुनींनी विष्णूकडून त्याची सगळी माहिती घेतली आणि ते पृथ्वीवर सांगितलेल्या ठिकाणी आले. विष्णूने सांगितलेला खरा भक्त एक साधा शेतकरी होता. त्यांना आश्चर्य वाटले. नारदमुनी सबंध दिवस तो शेतकरी काय करतो, हे पहात राहिले. सकाळी तो लवकर उठायचा. देवाचे नामस्मरण करायचा. दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री झोपतांना 'देवा, आज तुझ्यामुळे मी माझं काम करू शकलो. तुझ्याच कृपेने आजचा दिवस चांगला गेला. अशीच कृपा माझ्यावर सतत राहू दे', अशी प्रार्थना करून झोपी जायचा. हे पाहून नारदमुनींना तर गंमतच वाटली. हा दिवसातून एकदा नाम घेतो आणि प्रार्थना करतो. मी देवाचे अखंड नाम घेतो, मग हा खरा भक्त कसा ? नारदमुनी पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विचारले, ''देवा, आपण त्याला खरा भक्त कसे म्हणता, हे काही मला समजले नाही.'' त्यावर श्रीविष्णु हसले. ते नारदमुनींना म्हणाले, ''नारदा, तुम्ही एक काम करा. ही तेलाने भरलेली वाटी आहे. ती कैलास पर्वतावर भगवान शंकराला नेऊन द्या.'' नारदांनी ती वाटी घेतली. तेलाचे भांडे काठोकाठ भरलेले असल्याने वाटेत तेल सांडू नये; म्हणून नारदांचे सर्व लक्ष तिकडे लागले. त्यामुळे विष्णूचे नाव घेणे तसेच राहिले. ती वाटी त्यांनी भगवान शंकराला दिली तेव्हा त्यांना हायसे वाटले. 


ते परत विष्णूकडे आले. विष्णु म्हणाले, ''काय नारदा वाटी नेऊन दिलीत ? तेल सांडले नाही ना ?'' नारद म्हणाले, ''नाही, तेल न सांडता वाटी दिली.'' यावर विष्णूने विचारले, ''वाटेत किती वेळा माझे नामस्मरण केले ?'' नारद एकदम ओशाळले. ते म्हणाले, ''त्या वाटीकडे लक्ष असल्यामुळे मी नामस्मरण करायचे विसरूनच गेलो.'' त्यावर विष्णु म्हणाले, ''तुम्ही प्रतिदिन सारखेच माझे स्मरण करता; पण मृत्यूलोकी जातांना तुम्हाला माझी आठवण तरी झाली का ? तुम्ही नुसते भांडे नेतांनाही मला विसरलात; पण तो शेतकरी एवढे संसाराचे जंजाळ पाठीशी असतांनाही मला विसरत नाही. मग श्रेष्ठ कोण ते तुम्हीच ठरवा.'' हे ऐकून नारदला काय ते उमगले.
        मुलांनो, संसारात राहून नामस्मरण करत आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडणे, ही श्रेष्ठ  ईश्वरभक्ती होय. 



Monday, 11 March 2013

हनुमान

हनुमान 




 

तिथी

           काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. जन्माचा इतिहास राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
  



उत्सव साजरा करण्याची पद्धत

        या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
 

हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?

          `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा ब्रम्हांडी ( तिन्ही लोकी ) झेंडा ।।
की जन्मताच अशी सुखद परिचित अंजनी मातेला देणारा हनुमान

जन्मताच सूर्याकडे झेप :  राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : 

अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने    आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.         जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे. 





कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म

        मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्‍वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्‍वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.



Udan Stori ( Please Add Skeep ) ......................




महापराक्रमी

अ. राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले - `वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.' हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धुम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.




आ. अत्यंत बलशाली असलेल्या हनुमानाने सीतेच्या शोधासाठी ३२ किलोमीटर समुद्री अंतर पोहून पार केले. याबाबत वाल्मीकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे

यं यं देशं समुद्रस्य जागाम स महाकपि: ।
तस्य तस्योरुवेगेन सोन्माद इव लक्ष्यते ।। 


अर्थ : महाकपि (हनुमान) समुद्राच्या ज्या भागातून जात होता, तो भाग त्याच्या मांड्यांच्या वेगामुळे उन्मत्त झाल्यासारखा वाटत होता. यावरून हनुमानाच्या सामर्थ्याची आपण कल्पना करू शकतो. - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य)
 

अनेक कला, नैपुण्य, गुण, यांचा समुच्चय

अ. `ज्ञान-विज्ञान, कलासंपन्न व प्रगत अशा जातीचा प्रमुख नेता हनुमान उच्च विद्याविभूषित, ज्योतिषशास्त्र व अनेक कला यांचा ज्ञाता होता. बल, बुद्धी, विद्या, शौर्य व पराक्रम या अद्वितीय गुणांचा तो धनी होता. `हनुमान हा भाषाकोविद असून वेद व व्याकरण त्याने अभ्यासिले असावेत', असे मत स्वत: श्रीरामाने प्रकट केले आहे.




आ. वीणावादक असलेल्या हनुमानाची शास्त्रीय संगीतातील तीन प्रमुख संगीताचार्यांत गणना केली जाते. (अन्य दोन संगीताचार्य शार्दुल व कहाल होत.) `संगीत परिजात' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ हनुमानाच्या संगीत सिद्धांतावर आधारित आहे. त्याने प्रतिपादलेल्या `हनुमत् संगीत पद्धती'ला भारतीय शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे. त्याचे व्यक्‍तीमत्त्व म्हणजे भक्‍ती, शक्‍ती व युक्‍ती यांचा अपूर्व संगम होय. या श्रेष्ठ व्याकरणकाराचे व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, वार्तिक, भाष्य व संग्रह इत्यादींवर असामान्य प्रभुत्व होते.' - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य, पृष्ठ २१)

ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !

        हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.

भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण

अ. सगळया देवतांमध्ये फक्‍त मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.



Read Agrowon ( Please Add Skeep ) ............................


आ. लग्न न होणार्‍यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्‍तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्‍तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्‍तींचे लग्न भावी वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा कमी केल्या की लग्न होते. ५० टक्के व्यक्‍तींचे लग्न प्रारब्धामुळे होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्‍तींचे लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे उपाय योजावे लागतात.

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण) 



 

  द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. ती असे न करण्यासाठी विनवत होती; पण त्याचा काहीएक परिणाम त्यांच्यावर झाला नाही. द्रौपदीला वाटले, ‘माझे पाच पती आहेत. संपूर्ण जगाला ते भारी आहेत. ते माझे नक्कीच रक्षण करतील.’ तिने युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या सर्वांना साहाय्य करण्याची विनंती केली; पण कोणीच पुढे आले नाही. तिने सर्व ज्येष्ठांनाही हाक मारली; परंतु सगळे माना खाली घालून बसले होते. शेवटी तिने श्रीकृष्णाला हाक मारली. तो लगेच धावून आला. तिला वस्त्रे पुरवली आणि तिचे रक्षण केले. तिने श्रीकृष्णाला विचारले, ‘‘देवा, मी संकटात असल्याचे कळूनही तू मला साहाय्य करण्यास का आला नाहीस ?’’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तुला तुझ्या पतींवर विश्वास होता ना, तू त्यांना बोलावले; मग मी कसा येणार ? तू मला हाक मारताच मी आलो.’’ द्रौपदीने श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 

Raed Samaj Stori ( please Add Skeep ) ........................ 



तात्पर्य : देवाविना आपले कोणी नसते़  आपण ज्यांना आपले म्हणतो, तेही साहाय्याच्या वेळी येत नाही. एखाद्याला पुनःपुन्हा हाक मारली, तर एकदातरी त्या व्यक्तीला वळून मागे बघावेच लागते. देव मात्र एका हाकेला धावून येतो; पण आम्ही त्याला सोडून सर्वांना हाक मारत बसतो. आपण देवाला सतत हाक मारली, तर तो सतत आपल्यासमवेत राहाणार नाही का ? मग आतापासून नामजप करणार ना ?