Tuesday, 2 July 2013

पंचदशी विद्या - पंचदशीयंत्राचा विधि

                       पंचदशी विद्या - पंचदशीयंत्राचा विधि 



(  गुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .  )  



शुभ कार्याला शुभ दिवस , क्रूर कार्याला क्रूर दिवस पाहून आरंभ करावा . व यंत्र लिहून नदींत सोडून द्यावें . जें वहून जाणार नाहीं तें स्वतःजवळ ठेवावें त्यायोगें सर्व कार्यसिद्धि होईल . खालीं दिल्याप्रमाणें यंत्रांची संख्या लिहिली असतां त्या त्या समोरील कार्यसिद्धि होते .
 
संख्या फळ
२००० लक्ष्मी प्रसन्न होते
६००० निरोगी होतो
१००० सरस्वती प्रसन्न होते
१००० औषधी सिद्ध होतात .
२००० मंत्र यंत्र सिद्ध होते .
४००० ईश्वर प्रसन्न होतो .
२००० शत्रु वश होतो .
३००० सर्व वश होते .
२००० सभा मोहन होते .
६००० गर्व मोचन होतो .
२००० विदेशी घर होते .
२००० खुआति प्रसिद्धि होते .
३००० वैरी प्रसन्न होतो .
६००० गेलेली वस्तु प्राप्त होते .
५००० देव प्रसन्न होतो .
२००० दुःखनाश व सुख होते .
४००० उद्योग प्राप्त होतो .
१० विषनाश होतो .
५००० वन्ध्या स्त्री गर्भवती होते
३००० मित्रलाभ होतो .
४००० राजा प्रसन्न होतो .
१५००० मनातील इच्चा पूर्ण कोते
यंत्र लिहून पाण्यात सोडावे . जर काहीं इच्छा असेल तर कणकेंत गोळी बनवून मासोळीला खाउ घातली तर सर्व कार्यसिद्धी होईल . यंत्र लेखन विधि शुभ कार्याला उत्तर दिशेकडे तोंड करून व अशुभ कार्याला दक्षिण दिशेकडे करून करावा .
 
अथ मंत्रविधी -
१ ) स्त्रीसंग करू नये .
२ ) ब्रह्मचर्याने रहावे .
३ ) यंत्र लिहिण्यापूर्वी ‘ ॐ ह्रीं क्लीं स्वाहा ’ हा जप एक लक्ष करावा .
लोकांस मोहिनी पाडण्यासाठी १० यंत्रे रोज लिहावी . २० आकर्षणासाठी , ३० जपासाठी , १००० कार्यसिद्धीकरितां लिहावी . लेखणी आठ अंगुले असावी .
  लेखणी लिहावे
मोहनासाठी सुवर्ण मधाने
स्तंभन चांदी हळद
देवदर्शन सुवर्ण केशर
द्रुतगमन लोखंड शवभस्म
द्वेष लोखंड व्रणवृक्षरस
उत्पातशांती दूर्वा चंदन
 
कार्य किती वेळा लिहावी
बदीमोचन १० हजार
राज्यप्राप्ती २ लक्ष
सर्व सिद्धी ४० हजार
मोहनविद्या ५० हजार
राजा वश होतो ४० हजार
पाण्यात न बुडणे ४ लक्ष
वाक् ‍ सिद्धी ५ लक्ष
गत राज्यप्राप्ती २ लक्ष
नव निधीप्राप्ती ९ लक्ष
लक्ष्मी प्राप्ती ७० हजार
अष्ट सिद्धी ८ लक्ष
महादेवासारखे होणे १ लक्ष
दररोज १० ,२० ,३२ ,५० किंवा १०० वेळा लिहावे . ब्राह्मणाने भूर्जपत्रावर लिहावे . क्षत्रियाने ताडपत्रावर , वैश्याने कागदावर लिहावे . शूद्रानें पृथ्वीवर लिहावे . लाल आसन व लाल कपडा अनुष्टान सुरू असेपर्यन्त घालावा . जमिनीवर झोपावे . मूग व तांदूळ भोजनाला घ्यावे . वरीलप्रमाणे जोपर्यंत यंत्रलिखाण चाललेले आहे तोपर्यंत तसे रहावे व वागावे . श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु .



Tuesday, 12 March 2013

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती ! 




१. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त असल्याने समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत असणे आणि इतर शिष्यांना ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात’,असे वाटल्याने समर्थांनी त्यांचा संशय दूर करण्याचे ठरवणे 

         ‘छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ समर्थांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले. ते शिष्यांसमवेत रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करून झोपले. शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की, गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दुर्बळ मनाचे लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते, तसे वातावरण बनले.
   






२. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आल्याने शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारणे आणि त्यांनी भयंकर पोट दुखतअसल्याचे सांगून यावर वाघिणीचे ताजे दूध हेच औषध असल्याचे सांगणे

         इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना समजले की, समर्थ याच रानात कुठेतरी आहेत. शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आला. आत जाऊन बघितले, तर साक्षात् गुरुदेवच कासावीस होऊन कूस पालटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारले.
समर्थ : शिवा, भयंकर पोट दुखत आहे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, यावर औषध ?
समर्थ : शिवा, यावर काहीही औषध नाही. असाध्य रोग आहे. एकच औषध काम करू शकते; पण जाऊ दे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, निःसंकोच सांगा. गुरुदेवांना स्वस्थ केल्याविना शिवा शांत बसू शकत नाही.
समर्थ : वाघिणीचे दूध आणि तेसुद्धा ताजे काढलेले; पण शिवा, ते मिळणे अशक्य आहे.
  

३. शिवाजी महाराज वाघिणीच्या शोधार्थ निघणे, एके ठिकाणी वाघाचे दोन छावे दिसणे, पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून वाघीण गुरगुरणे आणि शिवाजी महाराजांनी वाघिणीला नम्रपणे प्रार्थना करून पाठीवरून हात फिरवणे

         शिवाजी महाराजांनी जवळ असलेले कमंडलू उचलले आणि समर्थांना नमस्कार करून ते लगेच वाघिणीच्या शोधात निघाले. थोडेसे दूर गेल्यावर एके ठिकाणी दोन वाघाचे छावे दिसले. महाराजांनी विचार केला, ‘निश्चित येथे यांची आई येईल.’ योगायोगाने तीही आली. आपल्या पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून ती महाराजांवर गुरगुरु लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते; परंतु येथे लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. त्यांनी धैर्य धारण केले आणि हात जोडून ते वाघिणीला विनंती करू लागले, ‘माते, मी येथे तुला मारायला किंवा तुझ्या पिलांना न्यायला आलेलो नाही. गुरुदेवांना स्वस्थ करण्यासाठी तुझे दूध पाहिजे. ते काढू दे. गुरुदेवांना देऊन येतो, मग भले तू मला खा.’ शिवाजी महाराजांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.
  



४. वाघिणीचा क्रोध शांत होऊन ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागणे, महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढून कमंडलू भरणे आणि तिला नमस्कार करून गुहेत पोहोचल्यावर समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकणे

         मुके प्राणीसुद्धा प्रेमाला वश होतात. वाघिणीचा क्रोध शांत झाला आणि ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागली. संधी पाहून महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढले आणि कमंडलू भरून घेतले. तिला नमस्कार करून ते अतिशय आनंदाने तेथून निघाले. गुहेत पोहोचल्यावर गुरुदेवांपुढे दुधाने भरलेले कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला. ‘‘शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास ! धन्य आहे शिवा ! तुझ्यासारखे एकनिष्ठ शिष्य असतांना गुरूंची वेदना काय राहू शकते ?’’ समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकली.
         आता शिष्यांना कळून चुकले की, ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील, तर त्याची विशेष योग्यता असते. तो विशेष कृपेचा अधिकारी असतो. ईर्षा केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण वाढतात; म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणार्‍या गुरुबंधूंना पाहून ईर्षा करण्यापेक्षा आपली दुर्बळता अन् दुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे.’

गोवर्धन पर्वत

गोवर्धन पर्वत 




        भगवान श्रीकृष्ण सर्वांना ठाऊक आहे ना ? तो गोकुळात रहायचा. तेथे गोवर्धन नावाचा मोठा पर्वत होता. गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण श्रीकृष्णाला `प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे', ते सगळेच समजते. श्रीकृष्ण गोपगोपींना म्हणाला, ``अरे, या गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला पाऊस मिळतो. तेव्हा आपण इंद्राची नको, गोवर्धन पर्वताचीच पूजा करूया. तेव्हापासून गोपी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले.
           


Read vigyan ( Please Add skeep ) ......................... 




हे पाहून इंद्राला राग आला. त्याने जोराने मुसळधार पाऊस पाडायला प्रारंभ केला. त्यामुळे नदीचे पाणी वाढू लागले. सगळेजण घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण म्हणाला, ``अरे, ज्या पर्वताची तू पूजा केली, तोच वाचवेल आपल्याला! आपण सगळे संघटित होऊया.'' मग गोपगोपी आपापल्या काठ्या घेऊन एकत्र आले. त्या वेळी श्रीकृष्णाने काय केले ठाऊक आहे का ? गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या एका करंगळीवर उचलला. त्या वेळी मोठा आवाज झाला. मग गोपगोपींनीही आपापल्या काठ्या त्या पर्वताला लावल्या. सर्वांना पर्वताखाली आश्रय मिळाला. इकडे इंद्राकडचे ढग संपले.
          
        अशा प्रकारे श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून सर्व गोपगोपींचे रक्षण केले आणि गोपगोपी यांनीही काठ्या लावून त्याच्या कार्यात साहाय्य केल्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाला. सेवा केल्यामुळे गोपगोपी मोक्षाला गेले.

रामभक्त हनुमान

रामभक्त हनुमान 




 


एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     


Read Mrathi News ( Please Skeep Add ) .................................................

सत्सेवेचे महत्त्व

सत्सेवेचे महत्त्व 



  प्रभु श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. त्या वेळी वाटेत समुद्र होता. हा समुद्र ओलांडून त्यांना लंकेला जायचे होते. समुद्रावरून कसे लंकेला जाणार ? मग वानरसेना आणि मारुतीने ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. प्रत्येक जण श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून नामस्मरण करत समुद्रात दगड टाकू लागले. तर काय आश्चर्य ! ते दगड पाण्यावर तरंगू लागले आणि काही दिवसांतच सेतू सिद्ध झाला.     


Read Joke ( Please Add Skeep ) ..................... 



जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते, तेव्हा त्यांना एका छोट्याशा खारुताईने बघितले. ती मनात म्हणाली, 'श्रीराम तर देवच आहे. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. मग मीपण त्यांना साहाय्य करते. ही तर श्रीरामाची सेवा आहे.' मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली आणि तिच्या हातून छोट्याशा हातात छोटे दगड आणि वाळू घेऊन समुद्रात नेऊन टाकू लागली. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. एका वानराने तिला म्हटले, ''ए चिमुरडे, तू कण कण वाळू आणून टाकतेस. त्याने काय सेतू बांधून होणार आहे का ? तेव्हा खारूताई म्हणाली, ''वानरदादा, मी मोठे दगड नेऊ शकत नाही. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही; पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. छोटी असली, तरी चालेल.'' असे म्हणत खारुताई परत वाळू घेऊन समुद्रात टाकण्याची सेवा करू लागली. असे बराच वेळ केल्यावर ती दमली; पण तरी न थांबता तिच्या खेपा चालूच होत्या. ती मनात काय म्हणत होती, ते ठाऊक आहे ? ती म्हणत होती, 'माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे, तोपर्यंत मी श्रीरामाची सेवाच करत रहाणार. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जातांना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले, कोण होते ते सांगा ? प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाने तिला बघितले आणि खारुताईला हातात उचलले. श्रीराम तिला म्हणाला, ''खारुताई तू छोटी आहेस; पण फार चांगली सेवा केलीस. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. 

तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात कि नाही. श्रीराम खारुताईला म्हणाला, ''जो कोणी तुझ्यासारखी सेवा करेल, त्याच्यावर मी नेहमी कृपा करीन. त्याला कधी काही न्यून पडणार नाही. बघा, देवाची कृपा झाली की, आपल्याला कधीच काही न्यून पडत नाही. मग देवाची कृपा कधी होणार ? खारुताईवर देवाची कृपा का झाली ? 


Read Samaj ( Please Add Skeep ) ............................................

गणपति

गणपति 



  


बालमित्रांनो, गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला 'विघ्नहर्ता' असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी 'चिंतामणी' हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.

        कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळयांना त्रास देत होता. ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करत होता. एकदा तो आपल्या साथीदारांसह रानात शिकारीस गेला. त्याच रानात कपिलमुनींचा आश्रम होता. त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांसह जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. कपिलमुनींची झोपडी (आश्रम) पाहून कणाला हसू आले. तो म्हणाला, ''तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार ?'' त्यावर कपिलमुनींनी आपल्या गळयात साखळीला लावलेला 'चिंतामणी' काढून तो एका चौरंगावर ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे तेथे एक जेवणघर निर्माण झाले. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट आणि चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून संतुष्ट झाले.
        कणाला तो मणी प्राप्त करण्याची आशा झाली. त्याने आपली इच्छा कपिलमुनींकडे व्यक्त केली; परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिलमुनींनी त्यास नकार दिला. त्यावर त्याने अत्याचाराने तो मणी हिरावून घेतला.  



त्यानंतर कपिलमुनींनी गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले. इकडे त्या मण्यासाठी कपिलमुनी आपल्याशी युद्ध करतील, असा ग्रह करून कण कपिलमुनींवर चाल करून गेला. गणपतीच्या कृपेने त्या रानात फार मोठे सैन्य निर्माण झाले. त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले. तेव्हा गणपति स्वत: रणांगणावर आला. त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केला; पण गणपतीने ते हवेतच आपल्या बाणांनी अडवले. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. कणाचे वडील राजा अभिजीतने रणांगणावर येऊन गणपतीला नमस्कार केला. कपिलमुनींचा 'चिंतामणी' त्यांना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सदगती द्यावी, अशी अभिजीतने गणपतीला विनवणी केली. दयाळू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले.
        गणपतीने कपिलमुनींना चिंतामणी परत मिळवून दिला; म्हणून गणपतीला 'चिंतामणी' असे नाव पडले.


दुष्ट वालीचा वध

दुष्ट वालीचा वध 



बालमित्रांनो, रामनवमीला प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, ते आज आपण पाहू.

        वाली आणि सुग्रीव हे दोघे भाऊ किश्किंदा नगरीत रहात होते. दोघांचेही एकमेकांवर फार प्रेम होते. त्यांच्यापैकी वाली हा मोठा असल्यामुळे तो त्या नगरीचा राजा होता. एकदा मायावी नावाचा एक बलाढ्य राक्षस त्या नगरीत आला. वाली आणि तो राक्षस यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. दोघेही तितकेच पराक्रमी होते. युद्ध करत ते दोघेही एका गुहेत शिरले. गुहेच्या दाराशी उभ्या असलेल्या सुग्रीवला गुहेत फार भयंकर युद्ध चालले असल्याचे आतून ऐकू येणाऱ्या आवाजामुळे समजले. अचानक एका मोठ्या आवाजासह रक्ताचा पाट गुहेतून येतांना दिसला. ते पाहून आपल्या भावाला वीरगती प्राप्त झाली, असे सुग्रीवला वाटले. मायावी राक्षस आता गुहेतून बाहेर येऊन आपल्यालाही मारून टाकेल, या भीतीने सुग्रीवने एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद करून तो नगरीत परतला. आपला भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे दु:ख सुग्रीवला होते; परंतु लोकांच्या आग्रहास्तव आणि वालीचा मुलगा वयाने लहान असल्यामुळे शेवटी सुग्रीवने राज्याभिषेक करवून घेतला. 


काही दिवसांनंतर वाली परत आला. तेव्हा राज्याच्या लालसेने सुग्रीवने आपल्याला धोका दिला, असा त्याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या प्रिय भावाला राज्यातून हाकलून लावले आणि त्याच्या पत्नीला बंदिस्त केले. आपल्या बलाढ्य भावाच्या रागाला घाबरून सुग्रीव पळाला आणि ऋष्यमूक डोंगरावर सुरक्षित राहिला. वालीला मातंगऋषींचा शाप असल्यामुळे तो तेथे येऊ शकत नव्हता.
        मध्यंतरी राम आणि लक्ष्मण हे दोघेही सीतेच्या शोधात या डोंगराच्या जवळून जात होते. ते पाहून हनुमंताने ही माहिती सुग्रीवाला सांगितली. त्या क्षणी सुग्रीवने जाऊन रामाचे पाय धरले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगितले. सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर रामाने सांगितले, ''मातेसमान असलेल्या आपल्या वहिनीला त्याने बंदिस्त केल्यामुळे वाली मृत्यूस पात्र आहे. मी वालीचा वध करून तुझी पत्नी आणि तुझे राज्य तुला मिळवून देईन.''   






ठरल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांसह सुग्रीव किश्किंदला गेला आणि वालीला युद्धासाठी आव्हान केले. आधीच चिडलेला वाली सुग्रीवला पहाताच अतिशय क्रोधाने त्याच्यासमोर उभा राहिला. दोघांमध्ये युद्ध चालू झाले. इकडे झाडाच्या आडोशाला असलेले राम आणि लक्ष्मण भ्रमात पडले; कारण वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये इतके साम्य होते की, त्यांना ओळखणे कठीण झाले. नंतर खुणेसाठी रामाने सुग्रीवला गळयात घालण्यासाठी फुलांचा एक हार दिला. आपल्या पाठीशी राम असल्यामुळे तो हार गळयात घालून अतिशय आत्मविश्वासाने सुग्रीव युद्ध करू लागला. काही वेळानंतर सुग्रीव युद्धामध्ये हतबल होत असलेला पाहून रामाने आपल्या बाणाने वालीला ठार केले. छातीत घुसलेल्या रामाच्या बाणामुळे वाली धाडकन् भूमीवर कोसळला आणि मरण पावला. शेवटच्या क्षणी मात्र त्याने राम आणि सुग्रीव यांच्याकडे क्षमायाचना केली.