Wednesday 18 September 2013

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

वेळ: खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात.
विधी: पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे. त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचण दूर होईल.
मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा.
वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.
गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.
दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी.
मूर्ती: गणपतीच्या दोनपेक्षा अधिक मूर्ती घरात ठेवू नये.
प्रदक्षिणा: श्री गणेशाला नेहमी एकच प्रदक्षिणा घालतात. अनेक नाही.
आसन: कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये.
पूजेचे साहित्य: पूजा सूरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.
वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.
मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.

पूजन प्रारंभ
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी.
दीप पूजन:- तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.
'हे दीप देवा ! मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित रहा.' यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.

पवित्रकर
विध‍ी : पूजा सुरू करण्यापूर्वी स्वत: किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. आपल्या उजव्या हातावर जल पात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वत: वर आणि पूजन साहित्यावर पाणी शिंपडा.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाच्या नाव उच्चारणाने पवित्र अथवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पावित्र्य प्राप्त करू शकतो. भगवान पुंडरीकाक्ष मला हे पावित्र्य प्रदान कर! (हे तीन वेळा म्हणावे.)

आसन पूजा:
विधी: आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी केली जाते.
मंत्र: 'हे माता पृथ्वी! आपण समस्त लोकांना धारण केले आहे, भगवान विष्णूलाही धारण केले आहे, अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा. (आसनावर पाणी शिंपडा)

स्वस्ती पूजन
विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो.
मंत्र: 'हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरीक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जला! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवा! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.' हे सदा कार्यात मग्न असणार्‍या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. 'हे नारायणी! सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रम्हा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.'

संकल्
हातात पाणी घेऊन म्हणा:- गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो.

No comments:

Post a Comment