Thursday 28 February 2013

कुंडली विवेचन आणि करिअर!!

कुंडली विवेचन आणि करिअर!!

(विनंतीवजा सूचना: हा धागा फक्त ज्यांना ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे, त्यांचेसाठीच आहे. कृपया, येथे ज्योतिष शास्त्र खरे का खोटे ही चर्चा आणि त्यासंदर्भातली खिल्ली अपेक्षीत नाही)

(१) ज्योतिषशास्त्रात जन्मलग्न कुंडली सोबतच भावचलीत कुंडली, नवमांश कुंडली आणि राशी कुंडली यांचे महत्व काय असते? कुठली कुंडली कशासाठी बघायची असते?
(२) जन्मलग्न कुंडली मध्ये करीअर/नोकरी/जॉब चे स्थान कोणते? करीअर चांगले होण्यासाठी कोणता/कोणते ग्रह जबाबदार असतात? व ते कुठल्या स्थानी असावे लागतात?
(३) खालील ग्रहस्थिती असलेल्या कुंडलीत करीअर बद्दल काय सांगता येईल?
प्रथम स्थानः मीन - शुक्र; द्वितीयः मेष - केतू; तृतीय: वृषभ - गुरु, चंद्र.
चतुर्थ: मिथुन रास, ग्रह नाही; पंचमः कर्क - शनी; सहावे: सिंह रास, ग्रह नाही.
सातवे: कन्या रास, प्लुटो; आठवे: तूळ रास, हर्षल, राहू; नववे: वृश्चिक रास, नेपच्यून;
दहावे: धनू रास, ग्रह नाही; अकरावे: मकर रास, मंगळ; बारावे: कुंभ रास, सूर्य, बुध
(४) तसेच ढोबळमानाने खालील निष्कर्ष बरोबर आहे का? चुकले असल्यास बरोबर काय ते सांगावे.(येथे मी सहा, आठ आणि बारा ही वाईट स्थाने गृहित धरली आहेत)
चांगले स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
चांगले स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
चांगले स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे वाईट
वाईट स्थान - चांगला ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (उच्चीचा/स्वराशी) असणे चांगले
वाईट स्थान - वाईट ग्रह (नीचीचा/निर्बली) असणे वाईट
ज्योतिष जाणकारांनी चर्चेत भाग घ्यावा, ही विनंती.


No comments:

Post a Comment